Yoshomati Thakur : ‘उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता’ यशोमती ठाकूर यांचा सनसनाटी आरोप

| Updated on: Jul 10, 2022 | 5:09 PM

Yoshomati Thakur : 'उमेश कोल्हे यांच्या हत्येचा मास्टरमाईंड राणा दाम्पत्याचा कार्यकर्ता' यशोमती ठाकूर यांच्या आरोपाने खळबळ

अमरावती : येथील उमेश कोल्हे खून (Umesh Kolhe Murder) प्रकरणातील मास्टरमाईंड (Mastermind) हा राणा दाम्पत्याचा (Rana Couple) कार्यकर्ता असल्याचा खळबळजनक आरोप माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yoshomati Thakur) यांनी केला आहे. राणा दाम्पत्याने उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणाचा इव्हेंट केल्याचा पलटवार केलाय. राणा दाम्पत्या दोन्ही बाजुंनी पोळी भाजण्याचा आणि फायदा घेण्याचा प्रयत्न करत असल्याचा अप्रत्यक्ष टोला त्यांनी हाणला. ठाकूर यांच्या गंभीर आरोपानं खळबळ उडाली आहे. उमेश कोल्हे (54) हे शहरातील एका मेडिकल स्टोअर्सचे मालक होते. 21 जून 2022 रोजी कोल्हे यांच्यावर रात्री उशीरा मेडिकलमधून घरी जात असताना जीवघेणा हल्ला झाला होता. भाजपाच्या वादग्रस्त नेत्या नुपूर शर्मा (Nupur Sharma) यांच्या समर्थनार्थ कोल्हेंनी पोस्ट लिहिली होती. यानंतर खासदार नवनीत राणा यांनी उमेश कोल्हे यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी माजी पालकमंत्र्यांवर प्रकरण दाबल्याचा आरोप केला होता.त्यानंतर समाज माध्यमांवर राणा आणि या खूनातील मास्टरमांईड यांच्या छायाचित्रावरुन यशोमती ठाकूर यांनी पलटवार करत गंभीर आरोप केले आहेत.

Published on: Jul 10, 2022 05:08 PM
MP Supriya Sule : हे सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय – खासदार सुप्रिया सुळे
शिवसेना कुणाची? एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरे या वादावर नेमंक काय म्हणाल्या सुप्रिया सुळे; पाहा व्हिडिओ