शिवसेना नेत्याने खोडला ‘त्या’ मंत्र्यांचा दावा, म्हणाले ‘सर्वात आधी तेच भेटले होते…’

| Updated on: Nov 03, 2023 | 8:25 PM

महाराष्ट्र अशांत राहू नये यासाठी सर्व पक्षांनी पाठिंबा दिला आहे. आज दोन महिन्यांचा कालावधी दिला आहे. सरकारने एक ठोस कारण दिलं पाहिजे. सरसकट आरक्षण देणार का? की पूर्ण महाराष्ट्रमध्ये आरक्षण देणार का? हे सगळं सरकारने आता स्पष्ट केलं पाहिजे. गुन्हे मागे घेऊ हे सरकारने सांगितलं आहे. पण, कृतीत उतरवणं हे सरकारची जबाबदारी आहे

मुंबई | 3 नोव्हेंबर 2023 : मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन संपले आणि काही नेते डेहराडूनला गेले असे विधान राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले. तसेच, जरांगे पाटील यांचे आंदोलन बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी केला असा आरोपही त्यांनी केला होता. त्यावर भाजप आमदार नितेश राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केलीय. नितेश राणे यांच्या या आरोपांना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिलंय. फक्त विरोधकांवर आरोप करणं योग्य नाही. सरकार तुमचे आहे, गृहखाते आहे. चौकशी करा की कुणी बदनाम केले ते. आता त्यांनी पुढाकार घेऊन ते स्पष्ट करावे अशी मागणी अनिल परब यांनी केलीय. उद्धव ठाकरे आता मुख्यमंत्री नाहीत. ते आता पक्षाध्यक्ष आहेत. सर्वात प्रथम उद्धव साहेब आणि शरद पवार हे जरांगे पाटील यांना भेटले. आंदोलन संपेपर्यंत ते मुंबईत होते. आम्हाला आमचं काम माहिती आहे, त्याच्यावर बोलणे महत्वाचं वाटत नाही असा टोला त्यांनी नितेश राणे यांना लगावला.

Published on: Nov 03, 2023 08:25 PM