Sanajay Raut: हे राज्य भारतीय जनता पक्षाकडून खेचून घेतले आहे- संजय राऊत

| Updated on: May 08, 2022 | 5:17 PM

हे राज्य भारतीय जनता पक्षाकडून खेचून घेतले आहे. हे राज्य टिकवायचे असेल. चालवायचे असले तर संजय राऊत, अरविंद सावंतासारखे लोक असून उपायोग नाही. हजारो लोक तयार झाले पाहिजेत असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

मुंबई – मी परत सांगतो , राज्य आपल्याला टिकवायचं असेल. या प्रवृत्ती विरोधात लढायचं असेल, टसर समोरच्या लोकांची ताकद ,समोरच्या लोकांच्या भूमिका बघून त्यानुसार आपल्याला आपल्या लोकांना तयार करावे लागेल. सैन्य हे पोटावरच चालत. शिवसेना(Shivsena ) प्रमुखांच्या काळामध्ये एका मोठी पिढी वडापाव खाऊन युद्ध करत होती. आता वडापाव (Wadapav)खाऊन युद्ध कराव लागणार नाही कारण महाराष्ट्र सरकार आपले आहे. महाराष्ट्रात आपले राज्य आहे. राज्य आपल्या हातात आहे. हे राज्य भारतीय जनता पक्षाकडून(BJP) खेचून घेतले आहे. हे राज्य टिकवायचे असेल. चालवायचे असले तर संजय राऊत, अरविंद सावंतासारखे लोक असून उपायोग नाही. हजारो लोक तयार झाले पाहिजेत असे मत खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे.

 

Navneet Rana: राणा दाम्पत्य म्हणजे सर्वसामान्यांच्या भाषेत बंटी-बबली होय- मनीषा कायदेंची टीका
Sanjay Raut : हिटलर इव्हेंट करायचा मोदीही तेच करतात, मोदी हिटलरलाच फॉलो करतात; राऊत म्हणतात, ही टीका नाही; पण…