Pune PMPML Strike : तब्बल ३० तासानंतर पुण्यात पुन्हा धावणार PMPML
पुण्यात ओलेक्ट्रा, हंसा, ॲंथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी ३ महिन्यांची बिले थकल्याने हा संप पुकारला होता.
पुणे : पुण्यातील सार्वजनिक बस वाहतूक सेवा ही संपामुळे विस्कळीत झाली होती. ती आता पुर्वपदावर येणार आहे. येथील सार्वजनिक बस वाहतूक करण्यात बसेसचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदारांनी अचानक संप (PMPML Strike) पुकारून पुणेकरांना वेठीस धरले होते. ओलेक्ट्रा, हंसा, ॲंथोनी, ट्रॅव्हल टाईम या चार ठेकेदारांनी ३ महिन्यांची बिले थकल्याने हा संप पुकारला होता. त्यानंतर काँग्रेस आणि भाजपच्या शिष्टमंडळाने PMPML संचालक मंडळाची भेट घेतली होती. त्यानंतर हा संप मागे घेण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे. तर पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या या ठेकेदारांवर कारवाई होणार का याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.
Published on: Mar 07, 2023 07:38 AM