‘एक राखी सैनिकांसाठी’ हा उपक्रमातून इगतपुरी येथील विद्यार्थिनींकडून सैनिकांना सलाम

| Updated on: Jul 25, 2023 | 11:33 AM

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी. सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणं-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. विद्यार्थीनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल.

नाशिक, 25 जुलै 2023 | देशाच्या रक्षणासाठी सैनिक सीमेवर कसे लढतात. त्यांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागते. प्रसंगी वीरमरण पत्करावे लागते. या सैनिकांचे मनोधैर्य, शौर्य, देशप्रेमाचा ध्यास, स्वाभीमान ही वस्तूस्थिती विद्यार्थ्यांना कळायला हवी. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती रुजायला हवी. सैनिकांना आपल्या गावात कधी कुठले सणं-उत्सव होतात, याची माहिती असली तरी देशबांधवांच्या संरक्षणाचे भान, कर्तव्याशी बांधील राहून सीमेवर तैनात असतात. विद्यार्थीनींनी पाठवलेल्या एका राखीने सैनिकांचे आत्मबल वाढेल. रक्षाबंधनाच्या धाग्यातून सैनिकांच्या त्यागाचे स्मरण करण्याची संधी या उपक्रमातून विद्यार्थ्यांनाही मिळेल. यासाठी इगतपुरी येथील महात्मा गांधी हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी ‘एक राखी सैनिकांसाठी‘ हा उपक्रम राबवला. तीन दिवसात दोन हजार राख्या आणि स्वलिखित शुभेच्छा पत्रे भारतीय सैनिकांसाठी तयार केलीत. या राख्या पोस्टाद्वारे देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवणार आहेत. शुक्रवारी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या व शुभेच्छा पत्र पोस्टाद्वारे पाठविण्यात येणार आहेत.

Published on: Jul 25, 2023 11:33 AM
“उद्धव ठाकरे बोलतात तेव्हा भाजपच्या पोटात गोळा येतो”, संजय राऊत यांचा घणाघात
“एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत”, संजय राऊत यांचा फडणवीस यांच्यावर निशाणा; म्हणाले, “सूर्य…”