कांदा उत्पादकांसाठी मोठी बातमी; अनुदानावरून राज्य सरकारने केली मोठी घोषणा
यावरून राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेत अनुदानाची घोषणा करण्यात आली होती. तर हे अनुदान 350 रुपये प्रतिक्विंटनुसार करण्यात आलं होतं.
मुंबई, 19 जुलै 2023 | राज्यातील कांदा उत्पादन शेतकरी अवकाळी पाऊस आणि कांद्याला दर नसल्याने संकंटात सापडला होता. यावरून राज्य सरकारकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेत अनुदानाची घोषणा करण्यात आली होती. तर हे अनुदान 350 रुपये प्रतिक्विंटनुसार करण्यात आलं होतं. मात्र ते ही शेतकऱ्यांना मिळालं नसल्यानं ते कधी मिळणार अशी विचारणा कांदा उत्पादन शेतकऱ्यांककडून होत होती. मात्र आता शेतकऱ्यांची चिंता मिटवणारी बातमी आली असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत अब्दुल सत्तार यांनी पावसाळी अधिवेशनात आज माहिती दिली. यावेळी सत्तार यांनी, राज्य शासनाकडून कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी देण्यात येणारं अनुदान हे १५ ऑगस्टपूर्वी देण्यात येईल अशी माहिती दिली आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांद्याचे 350 रुपये प्रतिक्विंट असणारे अनुदान लवकरच मिळणार आहे.