Special Report | तुर्त धनुष्यबाणना ठाकरे, ना शिंदेंना?

Special Report | तुर्त ‘धनुष्यबाण’ना ठाकरे, ना शिंदेंना?

| Updated on: Sep 07, 2022 | 9:37 PM

निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे ठरवण्याची गरज असल्याचं म्हणणं शिंदे गटाने रिट याचिकेत म्हटलंय. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.

दिल्ली : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाची स्थापना केली आहे. यात धनंजय चंद्रचूड, न्या.एम आर शहा, न्या. कृष्ण मुरारी, न्या.हिमाकोहली, न्या. पी नरसिंहा यांचा समावेश आहे. शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देऊ नये अशी याचिका दाखल करण्यात आलीय. यासाठी येऊ घातलेल्या महापालिका निवडणूकींचे कारण देण्यात आले आहे. निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी पक्ष आणि चिन्ह कोणाचे हे ठरवण्याची गरज असल्याचं म्हणणं शिंदे गटाने रिट याचिकेत म्हटलंय. तर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगाच्या प्रक्रियेला स्थगिती देण्याची विनंती ठाकरे गटाकडून करण्यात आलीय.

Published on: Sep 07, 2022 09:37 PM
…तर राज्य सरकार कोसळू शकते, घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचा गौप्यस्फोट
Special Report | लव्ह- जिहाद प्रकरणावरुन नवनीत राणा आक्रमक