Special Report | सत्तासंघर्षातल्या सुणावणीवर Exclusive रिपोर्ट
तिन्ही पक्षकारांना आपलं मत 3 पानांमध्ये मांडण्याचे निर्देशही देण्यात आलेत. 27 सप्टेंबरलाच निवडणूक आयोगाला चिन्हाबाबतच्या कार्यवाहीचे निर्देश घटनापीठ देणार आहे.
मुंबई : अखेर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर, सत्तासंघर्षाची सुनावणी सुरु झाली आणि 27 सप्टेंबरला अंतिम निकालासंदर्भात काही तरी संकेत मिळतील अशी आशा निर्माण झालीय. शिंदे गटानं मोठी खेळी करत, निकाल लागेपर्यंत धनुष्यबाण चिन्हं गोठवण्याची मागणी केली. 27 सप्टेंबरपर्यंत निवडणूक आयोगानं धनुष्यबाण चिन्हाबाबत निर्णय घेऊ नये, असे आदेश घटनापीठानं दिलेत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात 10 मिनिटं ऐकून घेऊ असंही घटनापीठानं म्हटलंय. तिन्ही पक्षकारांना आपलं मत 3 पानांमध्ये मांडण्याचे निर्देशही देण्यात आलेत. 27 सप्टेंबरलाच निवडणूक आयोगाला चिन्हाबाबतच्या कार्यवाहीचे निर्देश घटनापीठ देणार आहे.
Published on: Sep 07, 2022 09:54 PM