Vinayak Mete : संशय कायम, अपघाताचे ठिकाण सांगितले जात नव्हते, मेटेंच्या पत्नींचे काय आहेत आरोप?

| Updated on: Aug 16, 2022 | 7:47 PM

घटनेचे ठिकाणच सांगितले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय अपघातानंतरचा एक तास नेमके काय झाले याची माहिती होणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय काहीतरी गडबड असून माझ्यापासून सत्य दडवले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पोलीसांकडून चौकशी सुरु असली तरी नेमके काय समोर येणार हे पहावे लागणार आहे.

मुंबई : अपघातामध्ये शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष विनायक मेटे यांचे निधन होऊन दोन दिवस अलटले आहेत. असे असले तरी आता अपघाताच्या घटनेवरुन तर्क-वितर्क लावले जात आहेत. मराठा क्रांती मोर्चाने चौकशीची मागणी केल्यानंतर विनायक मेटे यांच्या पत्नींना देखील झालेल्या घटनेबाबत संशय आहे. अपघातानंतर त्यांनाही फोन आला होता. शिवाय त्या फोनवर ही घटना कुठे घडली आहे अशी विचारणा करीत होत्या. मात्र, घटनेचे ठिकाणच सांगितले जात नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. शिवाय अपघातानंतरचा एक तास नेमके काय झाले याची माहिती होणेही गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले आहे. शिवाय काहीतरी गडबड असून माझ्यापासून सत्य दडवले जात असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता पोलीसांकडून चौकशी सुरु असली तरी नेमके काय समोर येणार हे पहावे लागणार आहे.

Balasaheb Thorat on Vikhe Patil | विखे पाटलांना फार कमी वेळ मिळालाय, त्यात त्यांनी चांगलं काम करावं
Raigad Roha River Rafting | ऐन हंगामात कुंडलिका नदीमधील रिव्हर राफ्टिंगवर बंदी