TV9 मराठी’च्या बातमीची दखल; कामतकर यांच्या आर्त हाकेला धावून आला ठाकरे गट…
यातूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदतीची विनवणी केली होती. तर औषधोपच्या मदतीसाठी आर्त हाक दिली होती. ते मनक्याच्या आजारामुळे दोन वर्षापासून अंथरुणाला खिळून आहेत.
सोलापूर : येथील एसटी कामगार सेनेचे माजी विभागीय सचिव अरुण कामतकर यांची दैनिय स्थिती झाली आहे. औषधोपचारालाही त्यांच्याकडे पैसे नाहीत. तर ते अंथरुणाला खिळले आहेत. यातूनच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मदतीची विनवणी केली होती. तर औषधोपच्या मदतीसाठी आर्त हाक दिली होती. ते मनक्याच्या आजारामुळे दोन वर्षापासून अंथरुणाला खिळून आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मी भीक मागत नसून मदत मागत आहे, औषधोपचाराचा खर्च द्यावा अशी मागणी केली होती. सोबतच आपण ते सर्व पैसे परत देऊ असेही त्यांनी म्हटलं होतं. त्यांची ही कैफियत ‘Tv9 मराठी’च्या माध्यमातून जगासमोर आल्यावर ठाकरे गट सर्वसावला आहे. ठाकरे गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ यांनी दखल घेतली आहे. तसेच बेडवर खिळलेल्या शिवसैनिकाचा पूर्ण आरोग्याचा खर्च केला जाईल असेही सांगण्यात आलं आहे. इतकचं काय तर रुग्ण शय्येवर खिळलेल्या शिवसैनिक अरुण कामतकर यांची ठाकरे गटाने डॉक्टरांना घेऊन घरातच तपासणी देखील केली आहे. कामतकर यांच्या इच्छेनुसार सोलापुरातील आयुर्वेदाचार्य डॉ. शिवरत्न शेटे यांच्याकडे संपूर्ण उपचार केले जाणार आहेत.