Maharashtra Cabinet Expansion : पाहुण्यांचं जेवून झालं, आता घरच्यांची बारी; राज्य मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार लवकरच?

| Updated on: Jul 09, 2023 | 12:38 PM

अजित पवार आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचा गट शिंदे-भाजप युतीत आला. ज्यामुळे झालेल्या मंत्रिमंडळाचा विस्तारात अजित पवार हे उपमुख्यमंत्री तर इतर 8 जण मंत्री झाले.

मुंबई : राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील रखडलेलं मंत्रिमंडळाचा विस्तार हा नुकताच पार पडला आहे. यावेळी अजित पवार आणि त्यांच्या सोबत राष्ट्रवादीचा गट शिंदे-भाजप युतीत आला. ज्यामुळे झालेल्या मंत्रिमंडळाचा विस्तारात अजित पवार हे उपमुख्यमंत्री तर इतर 8 जण मंत्री झाले. त्यामुळे शिंदे गटासह भाजपमधील काही जणांना धक्का बसला. ज्यानंतर मंत्री पद न मिळालेल्या नेत्यांमध्ये नाराजीचा सुर येऊ लागला. त्यानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा आता तिसरा मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होण्याची शक्यता आहे. तर हा शपथविधी येत्या 2 ते 3 दिवसात होण्याची शक्यता आहे. यावेळी मंत्रिमंडळात काही फेरबदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. Maharashtra Cabinet Expansion

Published on: Jul 09, 2023 12:35 PM
पंतप्रधान मोदी यांच्यावर राऊत यांचा घणाघात; म्हणाले, ‘लूट आणि झूठ पहायचं असेल तर येथे या…’
एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या आमदाराचा अजित पवार यांना इशारा; निधी वाटपावरून डायरेक्ट भिडला