रेल्वे अपघातापाठोपाठ बिहारमध्ये मोठी दुर्घटना! अवघ्या 10 सेकंदात पुल नदीतच कोसळला, कुठं घडली ही घटना?
विशेष बाब म्हणजे यापूर्वीही हा पूल कोसळला असून, त्याची चौकशी सुरू आहे. याचदरम्यान आता रविवारी अचानक हा पुल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे नदीतच कोसळल्याने बांधकामाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
भागलपूर (बिहार) : सध्या देश ओडिशातील बालासोरमध्ये घडलेल्या रेल्वे अपघातामुळे हादरला आहे. येथे 280 च्यावर नागरिकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यावरून सध्या चांगलंच राजकारण तापलेलं आहे. याच दरम्यान आता बिहारमधील भागलपूरमध्ये बांधकाम सुरू असणारा पूल कोसळला आहे. सुलतानगंज-अगुवानी दरम्यान गंगा नदीवर बांधण्यात येत असलेला पुल गंगेत कोसळला. त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष बाब म्हणजे यापूर्वीही हा पूल कोसळला असून, त्याची चौकशी सुरू आहे. याचदरम्यान आता रविवारी अचानक हा पुल पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे नदीतच कोसळल्याने बांधकामाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहेत. दरम्यान या पुलाच्या बांधकामासाठी 1717 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. तर गंगा नदीवरील हा पुलाच्या कोसळण्यामागचे कारण मात्र अद्याप समजू शकलेले नाही.
Published on: Jun 05, 2023 07:39 AM