मुंबईकरांची चिंता मिटली; सात धरणात 68 टक्यांपेक्षा अधिक पाणीसाठा; पाणीकपात हटणार?

| Updated on: Jul 29, 2023 | 9:53 AM

कोकण पट्ट्यासह मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे जिल्ह्यात धुंवाधार पाऊस होत आहे. तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकिकडे मुसळधार पावसामुळे शेत पीकांना फटका बसत अशतानाच आता मुंबईसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे.

मुंबई, 29 जुलै 2023 | मागील काही दिवसांपासून राज्यातील कोकण पट्ट्यासह मुंबई, मुंबई उपनगर, पालघर, ठाणे जिल्ह्यात धुंवाधार पाऊस होत आहे. तर मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. एकिकडे मुसळधार पावसामुळे शेत पीकांना फटका बसत अशतानाच आता मुंबईसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे. कारण आता मुंबईकरांची होणारी पाणीकपात थांबणार आहे. मुंबईत गेल्या काही दिवसापासून मुसळधार, अतिमुसळधार पाऊस होत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव आणि धरणक्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा भातसा, विहार व तुळशी या सात धरणात सध्या 68 टक्यांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता मिटली आहे. हा पाणीसाठी आता 2024 पर्यंत पुरेल इतका आहे. Water shortage

Published on: Jul 29, 2023 09:53 AM
पुण्यातील कमान जलाशय ओव्हरफ्लो, भीमा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; नागरिकांना धास्ती
सोयाबीन अन् कापसाची शेती वाहून गेल्यानं अमरावतीच्या शेतकऱ्याचा आक्रोश; व्हिडीओ व्हायरल