कोल्हापूरची पंचगंगा पात्राबाहेर; 2019 च्या पुराच्या ताज्या झाल्या आठवणी, पहा ड्रोन दृश्य
मुसळधार पाऊसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सध्या कोल्हापूर शहरात पावसाचा जोर दिसत नसला तरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. ज्यामुळे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे.
कोल्हापूर 22 जुलै 2023 : जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसापासून पावसाचा जोर वाढला आहे. तर मुसळधार पाऊसाने जिल्ह्याला झोडपून काढले आहे. सध्या कोल्हापूर शहरात पावसाचा जोर दिसत नसला तरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होताना दिसत आहे. ज्यामुळे राधानगरी धरणातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग केला जात आहे. याचदरम्यान पंचगंगा नदीची पातळी वाढू लागली असून नदीची वाटचाल ही इशारा पातळीकडे होत आहे. हवामान विभागाकडून कोल्हापूर जिल्ह्यासाठी ऑरेन्ज अलर्ट दिलेला आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी सध्या 36 फुटांवरून वाहत आहे. पंचगंगा नदीच्या पातळीत सतत वाढ होत आहे. त्यामुळे कोल्हापुर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आला आहे. तर नदीने पात्र ओलांडले आहे. त्यामुळे पुरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या पंचगंगेची पाणीपातळी ही 36 फूट असून इशारा पातळी 39 फूट आहे. त्यामुळे कोल्हापुरकरांच्या २०१९ च्या पुराच्या आठवणी ताज्या झाल्या असून पुराचा धस्का अनेकांना घेतला आहे. तर पंचगंगेनं पात्र ओलांडल्याने तिचे रौद्र रुप दिसत आहे. पाहा तिचे ड्रोन दृश्य