‘या’ धरणाने गाठला तळ; पाऊस न पडल्यास वीजनिर्मितीसह पिण्याच्या पाण्याची होणार आणीबाणी

| Updated on: Jun 25, 2023 | 10:07 AM

सिंचनासाठी पाणी सोडले जाते. त्याशिवाय पिण्यासाठी देखील पाणी सोडलं जातं. मात्र यावेळी जून महिना संपत आला तरी राज्यात कोठेच मुबलक प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्याचा थेट परिणाम हा धरणातील पाणी साठ्यांवर दिसत आहे.

सातारा : साताऱ्यासह महाराष्ट्राची वरदायिनी म्हणून कोयना धरणाकडं पाहिलं जातं. याधरणातून वीज निर्मिती केली जाते. तर सिंचनासाठी पाणी सोडले जाते. त्याशिवाय पिण्यासाठी देखील पाणी सोडलं जातं. मात्र यावेळी जून महिना संपत आला तरी राज्यात कोठेच मुबलक प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्याचा थेट परिणाम हा धरणातील पाणी साठ्यांवर दिसत आहे. तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस न झाल्याने त्याचा थेट परिणाम हा धरणातील पाणीसाठ्यावर झाला आहे. तेथील पाणीसाठा निच्चांकी पातळीकडे जात आहे. त्यामुळे जर या आठवड्याभरात पाऊस झाला नाही तर वीजनिर्मितीसह सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. कोयना धरणाच्या पाणी साठ्याने ऐतिहासिक पाणी पातळी गाठली आहे. धरणाची पाणीसाठवण क्षमता 105 tmc असून फक्त10.75 tmc पाणीसाठा शिल्लक आहे. तर यातील 5 tmc पाणी साठा मृत पाणीसाठा समजला जातो. पाणी पातळी घटल्याने वीजनिर्मितीचा 4 था टप्पा यापुर्वीच बंद करण्यात आला आहे.

Published on: Jun 25, 2023 10:07 AM
ओडिशाच्या कटू आठवणी ताज्या असतानाच आणखी एक रेल्वेचा मोठा अपघात
“मोदी केवळ गुजरातचे पंतप्रधान नाही”, गुगलची गुंतवणूक गुजरातमध्ये गेल्याने छगन भुजबळ यांची टीका