Kalyan | उत्तर प्रदेशमधून बाईक आणली आणि कल्याणामध्ये चोरी केली
धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्हीत दिसणाऱ्या बाईकचा धागा पकडत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. ही गाडी उत्तर प्रदेशमधून कल्याणात चोरीसाठी आणली होती.
कल्याण : कल्याण डोंबिवली शहरात गेल्या अनेक दिवसांपासून सोनसाखळी चोरीच्या घटना वाढल्यात. या पार्श्वभूमीवर पोलीस सुद्धा अलर्ट झालेत. कल्याण पूर्वेत देखील एका महिलेचे दागिने लुटून चोर पसार झाले होते. यासंदर्भात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याचा तपास पोलिसांकडून सुरू होता. यादरम्यान 50 पेक्षा अधिक सीसीटीव्ही पोलीसांनी तपासले आणि अखेर दोन आरोपीना अटक केली. धक्कादायक बाब म्हणजे सीसीटीव्हीत दिसणाऱ्या बाईकचा धागा पकडत पोलीस आरोपीपर्यंत पोहचले. ही गाडी उत्तर प्रदेशमधून कल्याणात चोरीसाठी आणली होती.
Published on: Sep 17, 2022 10:29 PM