‘तर जाहीर माफी मागू’, राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांचे कुणाला आव्हान?

| Updated on: Oct 28, 2023 | 11:49 PM

मराठा आरक्षण हे आर्थिक निकषावर आरक्षण दिले पाहिजे ही आमची भूमिका आहे. वाशी टोलनाक्यावर दिवसाला लाखो वाहने जातात. खर्च जमा झाला असला तरी २०२४ पर्यंत करार आहे. त्यामुळे टोल बंद होणार नाही. पण, त्यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत.

नवी मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी नवी मुंबईतील वाशी टोलनाक्यावर सिवूडस येथील सीसीटीव्ही वॉर रूमला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रतिक्रिया देताना मंत्री रवींद्र चव्हाण यांना खुले आव्हान दिलंय. आमच्या आंदोलनाने 65 टोलनाके बंद झाले. दिवसाला लाखोंच्या संख्येने वाहने जातात. त्यामुळे आतापर्यंत 10 हजार कोटींच्या वर महसूल जमा झाला. जर खर्च जमा झाला असेल तर टोल बंद व्हायला हवे. मात्र, 2024 पर्यंत करारानुसार टोल बंद होणार नाही. नागरिकांना टोल माफी तोपर्यंत तरी मिळणार नाही. यावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. मुंबई गोवा महामार्गावर प्रतिक्रिया देताना त्या म्हणाल्या, रवींद्र चव्हाण यांना आव्हान आहे की त्यांनी आम्हाला एक लेन पूर्ण झाल्याचे दाखवावे. आम्ही जाहीर माफी मागतो. मी मुलाला विचारलं, मुंबई गोवा महामार्गावर पुन्हा आंदोलन कधी करतो. तर त्यांनी आम्ही तयार आहोत असे सांगितले.

Published on: Oct 28, 2023 11:48 PM
‘शिंदेमुळे भाजपची प्रतिष्ठा धुळीस गेली’, शिंदे गटाच्या आमदाराने सुनावले
‘सहा बॉलमध्ये एखादा नो बॉल तसे…; शिंदे म्हणजे एका हत्तीची…’ बच्चू कडू नेमक काय म्हणाले?