आधी शेतकऱ्याला रडवलं, अन् आता ग्राहकांना; टॉमेटोला आला सोन्याचा भाव

| Updated on: Jun 28, 2023 | 12:23 PM

त्यातल्या त्यात कांदा थोडा वधारला मात्र टोमॅटोला दर काही मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील टोमॅटोवर नांगर फिरवला. तर अनेकांनी तो रस्त्याच्याकडेला टाकला. पण आता तोच टोमॅटो सोनाच्या भावात जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता अरे देवा म्हणायची वेळ आली आहे.

मुंबई : गेल्या दोन महिन्यात कांदा आणि टोमॅटोनं बळीराजाच्या डोळ्यात पाणी आणलं होतं. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा आणि टोमॅटो पिकाचे अतोनात नुकसान झालं होतं. त्यातल्या त्यात कांदा थोडा वधारला मात्र टोमॅटोला दर काही मिळाला नाही. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आपल्या शेतातील टोमॅटोवर नांगर फिरवला. तर अनेकांनी तो रस्त्याच्याकडेला टाकला. पण आता तोच टोमॅटो सोनाच्या भावात जात आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना आता अरे देवा म्हणायची वेळ आली आहे. तर टोमॅटो हा 100 ते 110 रूपये झाल्याने सामान्य ग्राहकांचे मात्र बजेट बिघडले आहे. आषाढी एकादशी आणि ईद उल जुहा (तीन दिवसीय मेजवानी) हे दोन महत्त्वाचे सण गुरुवार 29 जून रोजी येत आहेत. त्यामुळे टोमॅटोच्या दरात अचानक वाढ झाली आहे. शहराच्या काही भागात टोमॅटोचे भाव 80 ते 110 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तर टोमॅटोचे दर जर कमी करायचे असतील तर स्टोरेज वाढवा अशी मागणी व्यापाऱ्यांनी केली

Published on: Jun 28, 2023 12:23 PM
जळगावात शासन आपल्या दारी कार्यक्रम अन् पुन्हा एकनाथ खडसे आणि गुलाबराव पाटील यांच्यात जुंपली!
“आम्ही अतिरेकी आहोत काय?…तर देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा”, संजय राऊत यांनी का केली मागणी?