मंत्रिमंडळ विस्तारात कुणाकुणाला संधी, भाजप आणि शिंदे गटाकडून कुणाकुणाची नावं चर्चेत
बऱ्याच दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यानं शिंदे-फडणवीस सरकारमधले काही नेते नाराज आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काहींना संधी मिळाली नसल्यानं त्यांनी जाहीर नाराजीही बोलून दाखविली.
शिंदे आणि फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळाचा विस्तार दसऱ्याच्या आधी होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काही आमदारांची नाराजी दूर होण्याची शक्यता आहे. पाच ऑक्टोबरआधी शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बऱ्याच दिवसांपासून मंत्रिमंडळ विस्तार न झाल्यानं शिंदे-फडणवीस सरकारमधले काही नेते नाराज आहेत. पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात काहींना संधी मिळाली नसल्यानं त्यांनी जाहीर नाराजीही बोलून दाखविली. भाजपकडून प्रवीण दरेकर, डॉ. संजय कुटे, गणेश नाईक, प्रशांत ठाकूर, मदन येरावार, राणा रणजितसिंह पाटील, नितेश राणे, माधुरी मिसाळ,राहुल कुल, विजय देशमुख, संभाजी पाटील निलगेकर यांची नावं चर्चेत आहेत. तर शिंदे गटाकडून बच्चू कडू, संजय शिरसाठ, भरत गोगावले, राजेंद्र पाटील वड्रावकर, प्रकाश आबटकर, किशोर पाटील यांची नावं चर्चेत आहेत.
Published on: Sep 18, 2022 09:57 PM