‘जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील…,’ काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे
भाजपाने नेहमीच छोट्या पक्षांचा सन्मान केला आहे. आम्ही कॉंग्रेस सारखे छोट्या पक्षांना संपविणारे नाही असा दावा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. भाजपात खूप स्पेस त्यामुळे पंतप्रधान मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या विकासासाठी ज्याला कुणाला भाजपात यायचे आहे त्यांनी यावे असेही बावनकुळे यांनी म्हटले आहे.
मुंबई | 25 फेब्रुवारी 2024 : भारतीय जनता पार्टी छोट्या पक्षांना सांभाळणारी पार्टी आहे. ही पार्टी कॉंग्रेस सारखी नाहीए या पार्टीत छोट्या पक्षांना सन्मान आहे. भारतीय जनता पक्ष वाढविणे आणि पक्षाची उंची वाढविणे ही माझी जबाबदारी आहे त्यामुळे जेवढे जेवढे लोक भाजपमध्ये येतील त्या सर्वांना भाजपात स्थान आहे. पक्षामध्ये खूप स्पेस असल्याचे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. लहान पक्षांना आम्ही सांभाळत आलो आहोत. प्रत्येक छोट्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहचा असे मी म्हटले होते, देशाच्या विकासासाठी मोदींवर विश्वास ठेवून ज्यांना पक्षात यायचं आहे त्यांना सोबत घ्या असे मी म्हणालो होतो. परंतू माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. महाविकास आघाडीपेक्षा बच्चू कडू यांना महायुतीने जास्त चांगले सांभाळले आहे. अटल बिहारी वाजपेयींनी एनडीएचे सरकार सांभाळले. एनडीएचे बहुमत असतानाही मोदींनी अनेक सहकारी पक्षांना सोबत घेतले. 2014 -19 महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी बहुमत असतानाही छोट्या पक्षांना सोबत घेतले. महादेव जानकर आणि सदाभाऊ खोत यांनी महायुतीने मंत्री पदे दिली असेही चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.