रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद चिघण्याची शक्यता; शिंदे गट-पवार गट आमनेसामने

| Updated on: Jul 12, 2023 | 2:08 PM

अजित पवार गटाचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश झाला असून ८ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. पण अजूनही खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचा समावेश झाला नसल्याने अनेक इच्छुक सध्या नाराज आहेत.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या राष्ट्रवादी गटामुळे सध्या शिंदे-फडणवीस-पवार युतीत वाद होताना दिसत आहे. अजित पवार गटाचा नुकताच मंत्रिमंडळात समावेश झाला असून ८ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली आहे. पण अजूनही खातेवाटपाचा तिढा सुटलेला नाही. त्यातच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाचा समावेश झाला नसल्याने अनेक इच्छुक सध्या नाराज आहेत. यात रायगटचे शिंदे गटाचे नेते आमदार भरत गोगावले यांनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. तसेच त्यांनी त्यांच्यासह मंत्री उदय सामंत यांनी देखील गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री असतील असे म्हटलं होतं. पण आता अजित पवार गटाच्या सत्तेतील समावेशाने रायगडच्या पालकमंत्रीपदावर आदिती तटकरे यांच्याकडून दावा केला जात आहे. त्यावरून आता रायगडच्या पालकमंत्रीपदावरून वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Published on: Jul 12, 2023 02:08 PM
‘सरकारमध्ये एक सीएम, एक माजी, तर एक इच्छुक’; काँग्रेस नेत्याची सरकारवर खोचक टीका
“कलंकला कलंक नाही म्हणायचं नाही, तर…?”, सुषमा अंधारे यांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका