रामलल्लाच्या दर्शनासाठी मुहूर्ताची गरज नाही, उद्धव ठाकरे यांची भूमिका
दिल्लीत इंडियाची बैठक झाली होती. तेव्हाच दिल्लीत चर्चा होईल असे ठरले आहे. अजूनपर्यंत दिल्लीतील नेत्यांनी काही म्हटले नाही तोपर्यंत येथे आम्ही कोणी बोलणार नाही. सगळ्यांच्या डोळ्यासमोर देश आणि लोकशाही वाचली पाहीजे असे ठरले आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या दर्शनासाठी 22 जानेवारी काही मुहूर्त नाही. माझी इच्छा होईल त्यावेळी मी दर्शनाला जाईल असे शिवसेना नेते उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
मुंबई | 30 डिसेंबर 2023 : राम मंदिराच्या दर्शनासाठी 22 जानेवारीचाच मुहूर्त आहे, असे काही नाही. आता त्यांना इव्हेंट करायचा आहे. करू द्या. परंतू राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्धाटन झाले असते तर चांगले झाले असते. जेव्हा माझ्या मनात येईल त्यावेळी मी राम मंदिराचे दर्शन घेईल. याआधीही मी अयोध्येला गेलेला आहे, पुन्हा जाईन असे प्रतिपादन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. निवडणूकांचे पडघम वाजू लागले आहेत. लोकसभेच्या निवडणूका 30 एप्रिलच्या आधी झाल्या तरच त्यांना फायदा होईल असे आपल्या कानावर आले आहे. आमच्या महाआघाडीत कोणतीही बिघाडी होणार नाही. जागा वाटपा संदर्भात चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीशी बोलणी चाललेली आहेत. वंचितशी देखील बोलणी सुरु आहेत आणि आमचं सर्व व्यवस्थित सुरु असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
Published on: Dec 30, 2023 03:39 PM