एवढं थयथयाट करण्याची काय गरज आहे; नितेश राणे यांचा मुश्रीफांवर हल्ला
हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. तसेच भ्रष्टाचार झाला नसेल तर त्यात घाबरायची काय गरज आहे, आणि इतका थयथयाट करण्याची काय गरज असल्याचा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.
वर्धा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्यांवर भाजप नेते, माजी खासदार किरट सोमय्या यांनी आरोप करत त्यांच्याविरोधात कारवाईची मागणी केली होती. त्यावरून अनिल देशमुख, नवाब मलिक यांच्यावर कारवाई यांच्यावर कारवाई झाली आहे. देशमुख हे सध्या बाहेर आले आहेत. तर मलिक यांच्यावर उपचार सुरू आहेत. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापूर जिल्ह्याचे नेते, आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर देखिल आरोप झाले. यावरून आज त्यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. त्यावरून हसन मुश्रीफ यांनी भाजपवर टीका केली.
हसन मुश्रीफ यांनी केलेल्या टीकेला भाजपचे आमदार भाजपचे नेते, आमदार नितेश राणे यांनी उत्तर दिले आहे. तसेच भ्रष्टाचार झाला नसेल तर त्यात घाबरायची काय गरज आहे, आणि इतका थयथयाट करण्याची काय गरज असल्याचा सवाल मुश्रीफ यांनी केला आहे.
याबरोबरच यांनी कितीही भ्रष्टाचार करायचा, सत्तेत असताना चोऱ्यामाऱ्या करायच्या, महापुरुषांबाबत अपशब्द बोलायचे मग नंतर यांनी दिलगिरी व्यक्त केली ती महाराष्ट्राने स्वीकारायची म्हटलं आहे. महाविकास आघाडीची सत्ता असताना आमची घरं तोडली, आमच्यावर चुकीच्या केसेस टाकल्या, अटकही केली. आता ईडीची चौकशी चालू आहे.. पुढे काय होते ते बघू, एवढं थयथयाट करण्याची काय गरज आहे, असेही नीतेश राणे म्हणाले