युतीबाबत उद्धव ठाकरे आणि मोदींमध्ये चर्चा झाली होती, खासदार शेवाळे यांचा गौप्यस्फोट
ठाकरे दिल्लीला नरेंद्र मोदी यांना भेटायला आले होते. मोदींबरोबर ठाकरे यांची एक तास चर्चा झाली. ही बैठक जूनला झाली. जुलैमध्ये विधानसभेचे अधिवेशन होते.
नवी दिल्लीत एकनाथ शिंदेंसह 12 खासदारांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार शेवाळे म्हणाले, उद्धव ठाकरेंपुढं भाजपसोबत युतीचा आग्रह केला होता. एनडीएसोबत जायचं असेल, तर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती निवडणुकीत एनडीएच्या उमेदवाराला मदत करायची ठरलं. सर्व खासदारही उपस्थित होते. त्यावेळी ठाकरेंनी सांगितलं होतं की, मला पण युती करायची आहे. युतीबाबत उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यातही चर्चा झाली होती. ठाकरे दिल्लीला नरेंद्र मोदी यांना भेटायला आले होते. मोदींबरोबर ठाकरे यांची एक तास चर्चा झाली. ही बैठक जूनला झाली. जुलैमध्ये विधानसभेचे अधिवेशन होते. परंतु, त्यादरम्यान भाजपच्या १२ आमदारांवर निलंबनाची कारवाई केली. त्यामुळं भाजपचे वरिष्ठ नेते नाराज झाले. कित्तेकवेळा ठाकरे यांनी भाजपच्या वरिष्ठांची युतीबाबत चर्चा केली होती.
Published on: Jul 19, 2022 07:28 PM