सदा सरवणकरांवर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी होणार!
शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे.
आमदार सदा सरवणकर (MLA Sada Sarvankar) यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांची चौकशी करण्यात येणार आहे. दादर पोलीस यासंदर्भात चौकशी करणार आहेत. सरवणकर यांच्याकडून पिस्तूल आणि काडतुसांची माहिती घेण्यात येणार आहे. दादर परिसरातील सीसीटीव्ही सुद्धा तपासले जाणार आहेत. पोलिसांकडून साक्षीदारांनाही शोधण्याचा प्रयत्न चालू आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिंदे गट आणि शिवसैनिक (Shivsainik) कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. महत्त्वाचं म्हणजे यावेळी शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी गोळीबार केला, असा आरोप करण्यात आला. पण याबाबतचे पुरावे अद्याप समोर आलेले नाहीत. या प्रकरणी शिंदे गटाचे (Shinde Group) नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे.
Published on: Sep 11, 2022 01:17 PM