बाहेर पडताय, तर मुंबई लोकलचे एकदा वेळापत्रक बघाच
पश्चिम रेल्वेवर पाचव्या मार्गिकेच्या निर्मिती करण्याकरता जोगेश्वरी ते बोरवली दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे
मुंबई : आज रविवार मुंबईच्या तिन्ही रेल्वे मार्गावरती मेगाब्लॉक असणार आहे. रेल्वे मार्गिकेच्या दुरुस्ती करता हा मेगाब्लॉक दर रविवारी रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात येते. हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. तर मध्य रेल्वेच्या मार्गावर ठाणे ते कल्याण दरम्यानही लोकल धावणार नाही. पश्चिम रेल्वेवर पाचव्या मार्गिकेच्या निर्मिती करण्याकरता जोगेश्वरी ते बोरवली दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असणार आहे. हा मेगा ब्लॉक रेल्वेच्या तिन्ही मार्गावर सकाळी साडेदहा ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना आज कामानिमित्त घराबाहेर पडताना त्रास सहन करावा लागणार आहे.
Published on: Mar 26, 2023 09:52 AM