‘लाडकी बहिण योजनेच्या निकषात…,’ काय म्हणाल्या आदिती तटकरे
महाराष्ट्रात भाजपा प्रणित महायुतीला विधानसभेत मोठे ऐतिहासिक यश मिळवून देणारी लाडकी बहिण योजनेतील अर्जाची छाननी सुरु असल्याचे बातम्या मीडियात येत आहेत. त्यामुळे या योजनेचे निकष बदलणार का ? असा सवाल निर्माण झाला आहे. यावर राष्ट्रवादीच्या नेत्या आदिती तटकरे यांनी स्पष्टीकरण केले आहे.
मध्य प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरु केली होती. तिला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. या योजनेत दोन कोटीहून अधिक अर्ज आले असून दीड कोटीहून अधिक लाडक्या बहिणींच्या खात्यावर दर महिन्याला १५०० रुपये थेट जमा होत आहेत.आतापर्यंत पात हप्ते या योजनेत मिळलेले आहेत. या योजनेतील निकष बदलणार अशा बातम्या सोशल मिडीयावर पसरल्या आहेत. त्याबाबत आमदार आदिती तटकरे यांनी खुलासा केला आहे. लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. या योजनेचे निकष बदलणार नाहीत. तशा पद्धतीच्या कोणतेही लेखी आदेश किंवा शासन निर्णय घेतलेला नसल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. ही योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरुच राहणार असल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे.
Published on: Dec 12, 2024 04:29 PM