Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांच्या या आहेत पाच मागण्या, अद्याप एकही मागणी मान्य झाली नसल्याचा आरोप
मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. कारण त्यांच्या पाचपैकी एकही मागण्या अद्याप मान्य झाल्या नसल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला. त्या प्रमुख पाच मागण्या अश्या आहेत.
जालना, ९ सप्टेंबर २०२३ : मनोज जरांगे पाटील हे उपोषणावर ठाम आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी जातप्रमाणपत्र देण्यात यावे, ही जरांगे पाटील यांची प्रमुख मागणी आहे. महाराष्ट्रातील मराठा समाजाला कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात यावं, असा जीआर शासनानं काढावा. १ जून २००४ चा जीआर आहे. मराठा समाजात कुणबी असल्याचा उल्लेख आहे. पण, त्याचा अद्याप उपयोग झाला नाही. त्याचा उपयोग करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र तात्काळ देण्यात यावे, अशी आमची मागणी आहे. हे तीन मुद्दे झाले. आमच्यावर खटले दाखल करण्यात आले आहेत. त्यापैकी काही जण रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावरील गुन्हे मागे घ्या. अद्याप त्यावर कोणतेही कारवाई करण्यात आली नाही. जे दोषी अधिकारी आहेत त्यांना तातडीने बडतर्फे करावे. आतापर्यंत कोणतीही कारवाई नाही. सक्तीच्या रजेवर दोषी अधिकारी भजे घात आहेत, अशी खोचक टीकाही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. किमान तीन-चार जणांना बडतर्फे केले गेले पाहिजे, असं जरांगे पाटील यांचं म्हणण आहे. शिवाय सात सप्टेंबरच्या जीआरमध्ये दुरुस्ती झालेली नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्यास नकार दिला.