‘ते’ अडकसिंह… ठाकरे – फडणवीस वादात मुख्यमंत्री शिंदे उतरले
पहिल्या दिवासपासून शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेत आहोत. पूर्वीचं अडीच वर्षात सरकार कडकसिंग सरकार नव्हते त्यामुळे अडकसिंह सरकार होतं. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो.
जेजुरी । 7 ऑगस्ट 2023 : सरकारी काम आणि सहा महिने थांब असे याआधी होत होते. पण, आमचे सरकार हे सर्वसामान्यांचे सरकार आणि सर्व सामान्यांना न्याय देणारे सरकार आहे. पहिल्या दिवासपासून शेतकऱ्यांसाठी आम्ही निर्णय घेत आहोत. पूर्वीचं अडीच वर्षात सरकार कडकसिंग सरकार नव्हते त्यामुळे अडकसिंह सरकार होतं. विकासाच्या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो. देशाला आज नरेंद्र मोदीच्याशिवाय पर्याय नाही म्हणून अजित पवारांनी सोबत येण्याचा निर्णय घेतला. अजित दादांचे मी स्वागत करतो. मोदी आणि अमित शहांच्या विकासाला साथ देण्याचा त्यांनी निर्णय घेतला. देवेंद्र फडणवीस यांना काही जण मस्टर मंत्री बोलतात. पण ते मस्टर मंत्री नाहीत तर फडणवीसजी मास्टरमंत्री आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केलाय. दिल्लीला गेल्यावर आमची टीका टींगल करता पण आम्ही लोकांसाठी आणि विकासासाठी दिल्लीला जाणारच असेही त्यांनी ठणकावले.