Ajit Pawar | ‘ते 40 आमदार म्हणतात, आम्ही सगळेच मुख्यमंत्री’ विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे गटाला काढला चिमटा
Ajit Pawar | राज्यात कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाहीत. कोणीच कोणाला आवरायला तयार नाहीत. ते ते 40 आमदार म्हणतात, आम्ही सगळेच मुख्यमंत्री आहोत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी जळगाव दौऱ्यावर असताना लगावला.
Ajit Pawar | राज्यात कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाहीत. कोणीच कोणाला आवरायला तयार नाहीत. ते ते 40 आमदार (MLA) म्हणतात, आम्ही सगळेच मुख्यमंत्री आहोत, असा टोला विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी जळगाव दौऱ्यावर असताना लगावला. राज्यात सगळा गोंधळ माजला आहे. ऊठसूठ कोणी काही वक्तव्य करत आहे. हे सरकार सर्वसामान्यांचे नाही. जनतेला हे सरकार मूर्ख बनवत आहे. त्यांना सर्वसामान्यांचं काहीच देणेघेणे नसल्याचा आरोप पवार यांनी लगावला.
कोणाला मदत मिळाली?
अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेले आहे. शेतकऱ्यांना मदतीचा धनादेश (Cheque) तातडीने देण्याची घोषणा करण्यात आली. तारीख सांगण्यात आली. आता चार दिवस उलटून गेले, कुठे आणि कोणाला मदत केली, ते सरकारने सांगावे असे आवाहन पवार यांनी केली. त्यावेळी त्यांनी स्टेजवरुन चेक मिळाला का अशी विचारण केली. त्यावेळी काहींनी अजून पंचनामेच झाले नसल्याचे सांगितले. त्यावर हे कसलं सर्वसामान्यांचं सरकार अशी टीका केली.