Protest On BJP Office | भाजप कार्यालयाबाहेर तृतीयपंथीयांचे आंदोलन – tv9

| Updated on: Jun 17, 2022 | 9:12 PM

भाजप मुख्य कार्यालयाबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशी विरोधात तृतीयपंथीयांनी टाळ्या वाजवत जोरदार घोषणाबाजी केली

मुंबई : काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांना समन्स बजावला आहे. तर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi)यांची नॅशनल हेराल्ड प्रकरणी (Nationa Herald) ईडीने (ED) सलग चार दिसव चौकशी करण्यात आली. त्याविरोधात पहिल्या दिवसापासूनच देशात काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आंदोलन करत आहेत. आजही राज्यात आंदोलन करण्यात आले. तर पोलिसांनी नेत्यांसह कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे. दरम्यान आज मुंबईतील भाजपच्या (BJP) मुख्य कार्यालयाबाहेर एक वेगळीच घटना घडली ज्यामुळे एकच गोंधळ उडाला तर पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली. भाजप मुख्य कार्यालयाबाहेर काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ईडीच्या चौकशी विरोधात तृतीयपंथीयांनी टाळ्या वाजवत जोरदार घोषणाबाजी केली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ईडी चौकशी विरोधात निषेध व्यक्त केला.

Published on: Jun 17, 2022 09:12 PM
Special Report | गोष्ट सदाभाऊ खोतांच्या उधारीची-tv9
Special Report | मानापमान नाट्याचे तिसऱ्या दिवशीही पडसाद-tv9