जरांगे पाटलांना हे सरकार खेळवतंय, एकनाथ खडसे यांनी केला आरोप

| Updated on: Dec 29, 2023 | 9:19 PM

सरकार मराठा समाजला मुर्ख बनवत आहे. मराठा आरक्षणाबाबत विसंगत विधाने करुन सरकार जरांगे पाटील यांना खेळवत ठेवत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. राम मंदिर आंदोलनात गंगाजल पुजनापासून शिलान्यासपर्यंत तसेच अडवाणीच्या रथयात्रेत आपण सहभागी होतो. आपणाला राम मंदिरातील रामलल्लाचे दर्शन जरूर घ्यायचे आहे. आपण आता त्या गर्दी दर्शन घेण्याच्या शारीरिक स्थितीत नाही. नंतर जरून आपण रामलल्लाचे दर्शन घेऊ असेही खडसे यांनी म्हटले आहे.

जालना | 28 डिसेंबर 2023 : मनोज जरांगे जेव्हा पहिल्यांदा आमरण उपोषणाला बसले होते. तेव्हा संकट मोचक म्हणून गिरीश महाजन त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा ओबीसीमधून आरक्षण देऊ असे त्यांनी लिहून दिल्याचे जरांगे पाटील सांगत होते. आता सरकार त्या शब्दापासून मागे फिरत आहे. आता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण देऊ असे सरकार म्हणत आहे. त्यामुळे सरकारच्या बोलण्यात विसंगती असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. आता मराठा समाजाला टिकेल असे आरक्षण देऊ असे सरकार म्हणत आहे म्हणजे मराठा समाजाला मुर्ख बनविण्याचे काम सरकार करीत आहे. जो निर्णय महिनाभराने घेणार आहे तो निर्णय आताही घेऊ शकते. मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्यावा अन्यथा महाराष्ट्रात बाका प्रसंग उद्भवू शकेल असेही राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. राम मंदिराच्या उभारणीत योगदान नसणारे देखील आता श्रेय घेत आहेत. कारसेवेत आम्हाला ललितपूर जेलमध्ये ठेवले होते. आमच्यावर लाठीमार झाला. राम लल्ला, ‘हम आयेंगे मंदिर वही बनायेंगे’, अशा घोषणा देत होते. ललितपूर जेलमध्ये गिरीश महाजन माझ्यासोबत नव्हते ते कोणत्या जेलमध्ये होते हे त्यांनी सांगावे. ज्याचं योगदान आहे ते बोलायला तयार नाही. ज्याचं योगदान नाहीत ते श्रेय घेत आहेत अशीही टीका महाजन यांच्यावर खडसे यांनी केली आहे.

Published on: Dec 28, 2023 02:21 PM
लेकरांना न्याय देण्यासाठी येतोय, मुंबईकरांनो साथ द्या, मनोज जरांगे पाटील यांचे आवाहन
Video | सारंगखेडा घोडेबाजारात थंडी बाधू नये म्हणून घोड्यांची घेतली जाते विशेष काळजी