Supriya Sule | हे स्वार्थी ईडी सरकार आहे, खासदार सुप्रिया सुळे यांचा घणाघाती आरोप

| Updated on: Sep 18, 2022 | 2:06 PM

Supriya Sule | सध्याचे स्वार्थी ईडी सरकार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

Supriya Sule | सध्याचे सरकार सत्ता टिकवण्यासाठी काहीही करायला तयार असल्याचा आरोप खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी केला आहे. या सरकारमधील मंत्री यापूर्वीच्या महाविकास आघाडी (Mahavikas Aaghadi) सरकारच्या काळात होती. त्यावेळी घेतलेल्या निर्णयाता त्यांचा ही सहभाग होता. पण आता यांनी सत्तांतरण केले तर त्यांनी यू-टर्न घेतल्याचा आरोप सुळे यांनी केला आहे. सत्तेसाठी किती तडजोड करावी याचे उत्तम उदाहरण सध्याचे सरकार आहे. सत्ता टिकली पाहिजे, हे त्यांचे धोरण आहे. सत्ता टिकावी यासाठी तडजोड करणे सुरु आहे. राज्यातील जनता वाऱ्यावर सोडल्या जाते. राज्यातील जनतेचे नुकसान होत आहे. सध्याचे स्वार्थी ईडी सरकार आहे, असा आरोप त्यांनी केला.

आम्ही संविधान मानणारे

राष्ट्रवादी पक्ष हा संविधान मानणारा आहे. तर भाजपचे अध्यक्ष म्हणतात की, एक देश एक पक्ष आहे. ही एक हुकूमशाहीच म्हणावी लागेल. ही देशातील दडपशाही आहे. जनता हे पाहत असल्याचेही त्या सांगायला विसरल्या नाहीत.

Published on: Sep 18, 2022 02:06 PM
Jayant patil | दिल्लीविरोधात बोलता येत नाही म्हणून वेदांताचे खापर राज्य सरकार आमच्यावर फोडत आहे, जयंत पाटील यांची टीका
आतुरता उद्धव साहेबांच्या गर्जनेची, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे पोस्टर व्हायरल…