MP Supriya Sule : हे सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय – खासदार सुप्रिया सुळे
बंडखोरीच्या दरम्यान या सरकारचे कारनामे ही जनता विसरणार नाही. आता जरी हे जनतेचे सेवक असल्याचे सांगत असले तरी त्यांचा स्वार्थ हा काही लपून राहिलेला नाही. पण तेच आता विठ्ठलाचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच टार्गेट केले आहे.
पुणे – मुख्यमंत्री म्हणतायत 25 वर्षे हे सरकार चालणार यावर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत . हे सरकार विमानातं फिरतंय, हॉटेलात बसतंय अन् अडीच हजाराची दाढी कटींग करतंय असे म्हणत त्यांनी उपरोधिक टोला खासदार सुप्रिया लगावला आहे. बंडखोरीच्या दरम्यान या सरकारचे कारनामे ही जनता विसरणार नाही. आता जरी हे जनतेचे सेवक असल्याचे सांगत असले तरी त्यांचा स्वार्थ हा काही लपून राहिलेला नाही. पण तेच आता विठ्ठलाचा आशिर्वाद घेण्यासाठी आल्याचे म्हणत सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच टार्गेट केले आहे. सरकार हे अस्थिर आहे पण खरे रुप लपवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Published on: Jul 10, 2022 04:44 PM