2024 च्या आधीच हे सरकार पडेल, मध्यवर्ती निवणूका घ्याव्या लागतील – जयंत पाटील
शिवसेनेचे बंडखोर आमदार व भाजप यांनी एकत्र येत भाजप सेना युतीचे नवीन सरकार स्थापना केले आहे. शिवसनेच्या आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला असले पाठींबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले.
मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) व देवेन्द्र फडणवीस याचे हे सरकार दीर्घकाळ टिकणार नाही, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील(jayant Patil) यांनी केलं आहे. 2024 च्या आधीच हे सरकार पडेल. तसेच मध्यवर्ती निवणूका घ्याव्या लागतील असे त्यांनी म्हटले आहे. भाजप(BJP) व एकनाथ शिंदे यांचा हा प्रासंगिक करार आहे. तसेच 2024 च्या निवडणुकीत आताचे बंडखोर आमदार पुन्हा निवडून येतील का नाही याची चांगली माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नुकतेच शिवसेनेचे बंडखोर आमदार व भाजप यांनी एकत्र येत भाजप सेना युतीचे नवीन सरकार स्थापना केले आहे. शिवसनेच्या आमदारांनी बंडखोरी करत महाविकास आघाडी सरकारला असले पाठींबा काढून घेतल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले.
Published on: Jul 01, 2022 04:04 PM