‘हे गळती सरकार आहे, यांच सगळच गळतंय…,’ उद्धव ठाकरे यांची जहरी टिका

| Updated on: Aug 03, 2024 | 2:54 PM

पुणेकरांनो तीन महिने थांबा सगळी यांची सगळी कंत्राटं रद्द करतो. हिंदुत्वाच्या वेडापायी आम्ही देखील काही वर्षे यांना पाठिंबा दिला होतो. ती मोठी चुक होती हे पाहून आज वाटतंय असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात उद्धव ठाकरे यांची महायुती सरकारवर जोरदार टिका केली आहे. मोदी सारखे सत्तर वर्षांचा हिशेब मागत असतात. यांच्या सरकारने बांधलेले संसद भवन देखील वर्ष झालं नाही तरी गळायला लागलं आहे. राम मंदिरात गळती, संसद भवनात गळती पेपर होतायत लीक हे गळती सरकारच आहे. यांचे सारच गळतंय अशी टिका उद्धव ठाकरे यांनी पुण्यातील शिवसंकल्प मेळाव्यात केली आहे. ते पुढे म्हणाले पुण्याच्या नदीला बुजवून याचा विकास सुरु आहे. राम मंदिराचे काम ज्या कंत्राटदाराला दिलेय त्यालाच यांनी नदीचं कंत्राट दिलेय. यांचा कंत्राटदार माझा लाडका अशी योजना आहे. नितीन गडकरी म्हणाले होते की असा रस्ते बांधणार की 200 वर्षात एकही खड्डा पडणार नाही. मुंबई ते गोवा महामार्गावर सर्वत्र खड्डेच आहेत. अजूनही तो पूर्ण झालेला नाही. मुंबईतही खड्डे पडले आहे. पुण्यात देखील यांनी विकासाच्या नावाखाली वाट लावली आहे.यांना खड्डा पुरुष पुरस्कार द्यायला हवा अशी टिका त्यांनी केली.

 

Published on: Aug 03, 2024 02:54 PM
‘तुझ्या नादाला लागण्याएवढ्या कुवतीचा तू…,’ काय म्हणाले उद्धव ठाकरे
‘कोर्टाला शेवटची विनंती….नाही तर आता…,’ काय म्हणाले उद्धव ठाकरे