Special Report | Gopichand Padalkar पुन्हा ‘बोलले’,..वादग्रस्त विधान चर्चेत!

| Updated on: Jun 06, 2022 | 9:03 PM

पुण्यातील आमदार सुनील शेळके यांनी गोपीचंद पाडळकरांवर घणाघाती टीका करताना लायकी नसलेल्या पडळकरांनी शरद पवारांवर टीका करणे शोभत नाही असे म्हटलं आहे.

Special Report : नाशिकमध्ये पार पडलेल्या कांदा परिषदेत भाजप आमदार गोपीचंद पडळकर (BJP MLA Gopichand Padalkar) यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर टीका केली. यावेळी पडळकर यांची जीभ घसरली. यावेळी ही त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांना टार्गेट करताना आमदार राहित पवार यांच्यावर देखील निशाना साधला. पडळकर यांनी आपल्या अनेक भाषणात शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीका केली होती. याच्या आधी ही पडळकर यांनी शरद पावार हे राज्याला लागलेले कोरोना असल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांनी आता आपल्या भाषणात शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena Chief Balasaheb Thackeray) यांच्या जुन्या वक्तव्याचा वापर करत अत्यंत खालच्या भाषेत पवारांवर टीका केली. यावेळी त्यांनी, “शरद पवार यांना लाथ घाला, खाली पाडा. त्यांना कांद्याचा वास द्या, म्हणजे आपल्या कांद्याला भाव मिळेल. असं म्हटलं होतं. त्यानंतर परत हे शब्द आपले नसून बाळासाहेबांचे होते. त्यावर बाळासाहेबांचे सुपुत्र तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसं करणार का असं म्हटलं होतं. त्यावर आता जोरदार टीकाटीपणी होत असून पडळकर यांच्या वक्तव्याचा समाचार राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेतला जात आहे. पुण्यातील आमदार सुनील शेळके यांनी गोपीचंद पाडळकरांवर घणाघाती टीका करताना लायकी नसलेल्या पडळकरांनी शरद पवारांवर टीका करणे शोभत नाही असे म्हटलं आहे. तर गोपीचंद पडळकर हे आमदार होण्याच्या पात्रतेचे नाहीत. त्यामुळे भाजपने अशा विकृत अवलादींना थांबवाव. नाहितर जशातसे उत्तर आम्ही देऊ असं रूपाली पाटील यांनी म्हटलं आहे. तर यावर भापने आपले मौन बाळगले आहे. मात्र याआधी पडळकरांना खोचक सल्ला देताना बाजू घेतली होती.

Published on: Jun 06, 2022 09:03 PM
Reserve Bank of India | नोटेवर गांधीजीऐवजी इतर फोटो बदलण्याच्या अफवांचं रिझर्व्ह बॅंकेकडून खंडन
Special Report | कोणते सत्तार खरे? आताचे की 8 महिने आधीचे?