Yoshomati Thakur On ED | भाजप नावाच्या वॉशिंग पावडरमध्ये सर्वच साफ होतात, यशोमती ठाकूर यांची सडकून टीका

| Updated on: Jul 31, 2022 | 6:08 PM

Yoshomati Thakur On ED | संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाई म्हणजे भाजपची दडपशाही असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे.

Yoshomati Thakur On ED | संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावरील ईडी (ED) कारवाई म्हणजे भाजपची दडपशाही असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर (Yoshomati Thakur) यांनी केला आहे. देशासह राज्यात भीतीचं वातावरण निर्माण करण्याची एकही संधी केंद्रातील सरकार सोडताना दिसत नाही. ईडी हे एकप्रकारे सरकारच्या हातातील बाहुलं झालं आहे. ते रोज कोणाच्याही घरात घुसतं आणि काहीतरी बाहेर काढतं असं झाल्याचं त्यांनी सांगितलं. पण भाजप नावाचं वॉशिंग पावडर आलं की सगळेच साफसुधरे होतात. संजय राऊत यांच्यावर ईडीची कारवाई करण्यामागे केंद्राचं मोठं षडयंत्र आहे. उद्धव ठाकरे (Udhav Thakeray) यांच्यावर दडपण आणण्यासाठीची ही कारवाई करण्यात आल्याची टीका त्यांनी यावेळी केली. हे दडपशाहीचं राजकारण आहे. केंद्रीय संस्थांचा दुरुपयोग केंद्र सरकार करत असल्याची टीका ही त्यांनी यावेळी केली.

Ambadas Danve on Raut | शिवसैनिक घाबरत नसतो, जे सरेंडर झाले, त्यांनी गद्दारी केली अंबादास दानवे यांचा पुन्हा हल्ला
Sanjay Raut | ‘मरेन पण झुकणार नाही,शिवसेना सोडणार नाही’;कारवाईनंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया