काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी भाजपचे हे दबाव तंत्र – अशोक चव्हाण

| Updated on: Jul 21, 2022 | 5:21 PM

महागाई, बेरोजगारी या गोष्टीनावर काँग्रेस कडून उठवला जाणाऱ्या आवाज दाबून टाकण्यासाठी भाजपकडून हे दबाव तंत्र वापरले जात असल्याचे मत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केले आहे.

मुंबई- काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांना मनी लॉन्ड्रीन प्रकरणी चौकशीसाठी बोलावल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर आंदोलने केली. यावेळी मुंबईमध्येही आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने काँग्रेसच्या(Congress)  नेतृत्वावर दबाव तंत्राचा वापर सुरु केलेला आहे. या विरोधात देशभर आंदोलने सुरु आहेत. लोकांचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. महागाई, बेरोजगारी या गोष्टीनावर काँग्रेस कडून उठवला जाणाऱ्या आवाज दाबून टाकण्यासाठी भाजपकडून हे दबाव तंत्र वापरले जात असल्याचे मत काँग्रेसचे नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chvhan)यांनी केले आहे. मुंबईतील आंदोलनात ते सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते. या देशात लोकशाही जिवंत राहू नये, यासाठी  भाजपचा (BJP)हा प्रयत्न आहे असा आरोप नितीन राऊत यांनी केला आहे.

Published on: Jul 21, 2022 05:21 PM
“हे अडीच वर्ष सोडून पुढेही आमचंच सरकार”; एकनाथ शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर
मोदी सरकारने कितीही घाबरवण्याचा प्रयत्न केला,तरी आम्ही घाबरणार नाही