पुण्यातील ‘हा’ देखावा होतोय चर्चेचा विषय, साकारली ‘या’ मंदिराची प्रतिकृती
कोथरूड परिसरातील साई मित्र मंडळ दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरांचे देखावे उभारतात. मंदिराचे देखावे ही या मंडळाची खासियत आहे. यापूर्वी पंढरपूरच्या विठ्ठलाचे मंदिर, जेजुरीच्या खंडोबाच्या मंदिराचे देखावे साई मित्र मंडळाने उभारले आहेत.
पुणे : 18 सप्टेंबर 2023 | लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही तास उरले आहेत. पुण्यातील गणेशोत्सव हा जगात चर्चेचा विषय असतो तो त्यातील असणाऱ्या भव्य देखाव्यांमुळे. दरवर्षी नवनवीन देखावे हे पुण्यातील गणेशोत्सवाचे खास आकर्षण असते. हेच देखावे साकारण्यासाठी पुण्यात ठिकठिकाणी गणपती मंडळांची जोरदार तयारी सुरू झाली आहे. दरवर्षी महाराष्ट्रातील वेगवेगळ्या मंदिरांचे देखावे उभारण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कोथरूड येथील साई मित्र मंडळाने यंदा अयोध्येतील राम मंदिराचा देखावा हुबेहूब उभारला आहे. या देखाव्याचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. तर, पुण्यातील 500 ते 600 कारसेवकांच्या हस्ते 24 तारखेला महाआरती होणार आहे. अशी माहिती श्री साई मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
Published on: Sep 18, 2023 11:00 PM