ठरलं! असं होईल, संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान
जगद्गुरू तुकाराम महाराजांचा यंदाचा 336 वा पालखी प्रस्थान सोहळा उद्या (1 जुलै) पार पडतोय, तर 2 जूलैला आळंदीतून ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान होतंय. (This year's 336th Palkhi Departure Ceremony of Jagadguru Tukaram Maharaj will be held tomorrow)
पुणे : पंढरपूरच्या आषाढी वारीला जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यापासून सुरुवात होते. प्रस्थान सोहळ्याच्या 3 दिवस आधीचं देहूनगरीत आणि आळंदीत लाखो वारकरी जमायला सुरुवात होते. जगद्गुरू तुकाराम महाराजांचा यंदाचा 336 वा पालखी प्रस्थान सोहळा उद्या (1 जुलै) पार पडतोय, तर 2 जूलैला आळंदीतून ज्ञानेश्वरांच्या पालखीचं प्रस्थान होतंय, मात्र यंदा कोरोनामुळं राज्य सरकारने पायी वारीला परवानगी नाकारली आणि बसनंच पालखी पंढरपूरला नेण्याचा निर्णय घेतला.