‘आम्ही अपात्र होऊ अशी स्वप्ने बघणारे…’ शिवसेना आमदाराने राष्ट्रवादीच्या आमदाराला झापले

| Updated on: Sep 24, 2023 | 11:47 PM

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर 16 आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणीला सुरवात होणार आहे. मात्र, त्याआधीच राष्ट्रवादी (शरद पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) आमदार यांनी एकमेकांवर जोरदार टीका केलीय.

कोरेगाव : 24 सप्टेंबर 2023 | राजकारणात सध्या सर्व काही ओके चालू आहे. राज्य सरकार, मुख्यमंत्री सर्व काही ओके आहे. काही जण आम्ही अपात्र होतोय अशी स्वप्न बघत आहेत. पण, आता तेच अपात्र झालेत अशी खोचक टीका शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी केलीय. कोरेगाव येथे विकास कामांच्या भूमिपूजन कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांनी अपात्रतेबाबत वक्तव्य करणाऱ्या नेत्यांवर जोरदार टीका केलीय. राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी महेश शिंदे यांच्यावर टीका केली होती, त्याला महेश शिंदे यांनी प्रतुत्तर दिलंय. आम्ही साधे लोक आहोत. कुणाची शेपटी कुठे पिळून कुठे घोडा उधळवायचा हे आम्हाला चांगलं समजतं. त्यामुळे आमची चिंता करू नका. तुमच्या अपात्रते नोटीस बाबत उत्तर द्या. आमच्या महायुतीतील तीनही नेते सक्षम आहेत, अशी टीका त्यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर केलीय.

Published on: Sep 24, 2023 11:47 PM
लोकसभेसाठी ‘त्या’ चार नावांची चर्चा, बावनकुळे म्हणतात, ‘कुठलाही निर्णय रस्त्यावर….’
Ajit Pawar यांना अर्थखात्याबद्दल शंका? भविष्याची चिंता की पुन्हा होणार राजकीय भूकंप?