झाडाला मास्क बांधा, कोरोनाला पळवा वसई परिसरात अफवांना पेव

“झाडाला मास्क बांधा, कोरोनाला पळवा” वसई परिसरात अफवांना पेव

| Updated on: May 29, 2021 | 1:44 PM

वसईच्या सन सिटी परिसरात एकाच झाडाला अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात मास्क बांधून कोरोना होत नसल्याची अफवा पसरविली असल्याची घटना समोर आली आहे. या झाडाला मास्क बांधल्याने कोरोना होत नाही, अशी खोटी अफवा पसरली आहे. याबाबतच व्हिडीओ ही मागच्या 4 दिवसापासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.याबाबतची वसईच्या माणिकपूर पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन, लोकांनी अशा प्रकारे झाडाला मास्क बांधून खोटी अफवा पसरू नये, याने कोरोना जात नाही. लक्षण जाणवली तर तात्काळ उपचार करावे, जर कोणी असा व्हिडीओ व्हायरल करून अफवा पसरविली तर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. लोकांनी यावर विश्वास ठेवू नये असे अहवान ही माणिकपूर पोलिसांनी केले आहे.

मराठा समाजाचे आरक्षण केंद्र सरकारच्या हातात आहे,B. G. Kolse Patil यांची माहिती
Headline | 1 PM | मुंबईत लसीसाठी कॉग्रेसची पोस्टरबाजी