पुणे-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास; गाड्यांचे टायरही फुटले

| Updated on: Aug 06, 2023 | 8:40 AM

मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. तर रस्त्यात पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचेही समोर येत आहे.

सातारा, 06 ऑगस्ट 2013 | गेल्या काही दिवसापासून सातारा शहराला पावसाने झोडपून काढले आहे. मोठ्या प्रमाणावर पडणाऱ्या पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. तर रस्त्यात पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांकडे महामार्ग प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचेही समोर येत आहे. येथील शहरा लगत असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या मोठ मोठ्या खड्यांमुळे जवळपास पंधरा गाड्यांचे टायर फुटल्याचे समोर आले आहे. त्यामुळे वाहनधारकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर खड्ड्यांमुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. तसेच खड्ड्यांमुळे गाड्यांचे नुकसान देखील होत आहे. यावरून ठाकरे गट आक्रमक झाला असून शहर अध्यक्षांनी याप्रकरणी थेट ठेकेदारालाच दम दिला आहे. तसेच रस्त्यातील खड्डे लवकर मुजवण्यात यावेत अशी मागणी केली आहे.

Published on: Aug 06, 2023 08:39 AM
सांगलीत सिविल हॉस्पिटलसाठी भीक मांगो आंदोलन? कोण करतय आंदोलन आणि नेमकं कारण काय?
BIG BREAKING | राज्य मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात मोठी बातमी, ठरलं? ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळाचा विस्तार