भाजप नेते किरीट सोमय्या नाशिक दौऱ्यावर
राज्याच्या जनतेला प्रचंड चीड आणि राग आहे, यासाठी धडपड करणं यासाठी सुड म्हणत असेल तर योग्यच आहे, यशवंत जाधव यांनी ज्या इमारती आणि फ्लॅट्स घेतलेयत, त्याचीही मोजणी इडीकडून सुरू झाली आहे.
किरीट सोमय्या आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यामुळे आज ते कुणावर टिका करतात हे पाहाव लागणार आहे. आजपर्यंत त्यांना महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यामुळे आज ते नाशिकमधून कोणाला टार्गेट करणार याकडे सगळ्यांचे डोळे लागलेले आहेत. ठाकरे सरकारच्या परिवाराची माहिती देणार आहे. त्याचबरोबर संजय राऊतांची 14 कोटींची , भावना गवळीची १०० कोटींची , प्रताप सरनाईकची ३५ कोटींची संपत्ती जप्त केली आहे. घोटाळेबाज जे कुणी आहे त्यांना केंद्रीय यंत्रणा सोडत नाही. राज्याच्या जनतेला प्रचंड चीड आणि राग आहे, यासाठी धडपड करणं यासाठी सुड म्हणत असेल तर योग्यच आहे, यशवंत जाधव यांनी ज्या इमारती आणि फ्लॅट्स घेतलेयत, त्याचीही मोजणी इडीकडून सुरू झाली आहे.
Published on: Jun 05, 2022 11:05 AM