आज राज ठाकरेंची सभा; विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर देणार?
आज राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार आहे, राज ठाकरे या सभेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला होता.
आज राज ठाकरे यांची ठाण्यात सभा होणार आहे, राज ठाकरे या सभेत नेमकं काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी सभा घेतली होती. या सभेत त्यांनी हिंदुत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत मशिदीवरील भोंग्यांबाबत वक्तव्य केले होते. या वक्त्यवावरून मोठा वाद निर्माण झाला होता. भाजपमधील काही नेत्यांकडून राज ठाकरे यांचे समर्थन करण्यात आले होते. तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांकडून राज ठाकरे यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. दरम्यान आज राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.