पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार

| Updated on: Oct 04, 2022 | 9:23 PM

शिंदे गटाप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार आहे.

शिंदे गटाकडून दसरा मेळाव्याची बीकेसी मैदानावर जोरदार तयारी करण्यात आली आहे. तर या दसरा मेळाव्याला 3 लाख लोकांची गर्दी जमवण्याचं टार्गेट शिंदे गटाकडे असणार आहे. तर राज्याच्या विविध भागातून शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला जाण्यासाठी 1800 बसेसची सोय करण्यात आली आहे. तर या बसेससाठी शिंदे गटाकडून रोख 10 कोटी रूपये महामंडळात भरण्यात आल्याचे समोर आले आहे. तर शिंदे गटाप्रमाणेच उद्धव ठाकरे यांच्याही शिवसेनेकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. यावेळी पहिल्यांदाच दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरे यांची तोफ धडधडणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या आधी आदित्य ठाकरे यांचे भाषण होणार आहे. तर शहाजी पाटील यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. तसेच यावेळीचा शिवसेनेचा दसरा मेळावा हा राष्ट्रवादीनं आंदन घेतल्याचंही पाटील यांनी म्हटलं आहे.

 

Published on: Oct 04, 2022 09:23 PM
शिंदेच्या दसरा मेळाव्याला राज्यभरातून 2 ते 3 लाख लोक जमणार? याबातमीसह पहा महाफास्ट न्यूज 100
टॉप 9 न्यूज – दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीच्या बातम्या