अंधेरीत कोण मारणार बाजी? मशाल जळणार की कमळ फुलणार, पहा टॉप 9 न्यूज

| Updated on: Oct 14, 2022 | 8:49 PM

ऋतुजा लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांवर लटकेंच्या विजयाची जबाबदारी दिल्याचे अनिल परब यांनी सांगितलं आहे.

प्रचंड शक्तीप्रदर्शनासह ऋतुजा लटकेंनी भरला शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज. अर्ज भरण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि हजारो कार्यकर्तांची जंगी रॅली सहभागी. तर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी महाविकास आघाडीचे नेते ही हजर. तर ऋतुजा लटके या महाविकास आघाडीच्या उमेदवार आहेत. त्यामुळे आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांवर लटकेंच्या विजयाची जबाबदारी दिल्याचे अनिल परब यांनी सांगितलं आहे. तर या पोटनिवडणुकीत लटके विक्रमी मतांनी निवडून येतील असेही परब म्हणाले. दरम्यान ठाण्यातील महिला आघाडीने मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी आपली शिवसेना ही बावनकशी सोनं असल्याचे ठाकरे म्हणाले.

Published on: Oct 14, 2022 08:49 PM
ऋतुजा लटकेच विजयी होतील : आदित्य ठाकरे असे का म्हणाले यासह पहा 4 मिनिट 24 हेडलाईन्स
भाजपाला शिंदेही नकोयत… महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्याचं वक्तव्य!