आनंदाचा शिधाचा बोजारा, यासह पहा टॉप 9 न्यूज

| Updated on: Oct 20, 2022 | 8:42 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारवर निशाना साधला आहे. शिंदे यांचे दिवाळी कीट म्हणजे फक्त लोकप्रिय घोषणा असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे. तर शिधा तर उपलब्ध होणारच नाही असेही त्यांनी म्हटलं आहे.

राज्य शासनाच्या आनंदाचा शिधाचा बोजारा उडाल्याचे चित्र राज्यातील अनेक भागात पहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्याच्या ठिकाणी आणि शासन मान्य धान्य दुकानात अद्यापही दिवाळी कीट पोहचलेलं नाही. त्यामुळे नागरिकांच्या हाती निराशाच पहायला मिळत आहे. तर यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी शिंदे सरकारवर निशाना साधला आहे. शिंदे यांचे दिवाळी कीट म्हणजे फक्त लोकप्रिय घोषणा असल्याची टीका मुंडे यांनी केली आहे. तर शिधा तर उपलब्ध होणारच नाही असेही त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील राजकारण हे चांगलेच तापले. त्यानंतर जाधव यांनी शिंदे सरकारवर हल्ला चढवताना, सुरक्षा काढून घेतल्यानंतर आपल्या घरावर हल्ला झाल्याचे म्हटलं आहे. तसेच जर आपल्याला काही झालं तर त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. तर राज्यात परतीच्या पावसामुळे शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिले आहेत. तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी राज्यात ओल्या दुष्काळाची स्थिती नाही. तशी स्थिती नसलीतरिही शेतकऱ्यांना भरीव मदत करणार असेही सत्तार म्हणाले.

 

Published on: Oct 20, 2022 08:42 PM
दिवाळी कीट, भास्कर जाधव यांचा सरकारवर हल्ला, फोन टॅपिंग प्रकरण यासह पहा इतर बातम्या 4 मिनिट 24 हेडलाईन्स
बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं आहे, पहा काय म्हणाले? बावनकुळे