बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं आहे, पहा काय म्हणाले? बावनकुळे
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं आहे. तसेच राष्ट्रवादीचं घड्याळ बारामतीतंच बंद पाडणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.
राज्य शासनाच्या आनंदाचा शिधा कार्यक्रमाचा बोजारा उडाल्याचे समोर येत आहे. राज्यातील अनेक भागात काही प्रमाणात दिवाळी कीटचं वाटप करण्यात आलं आहे. तर अनेक ठिकाणी हे कीट पोहलेच नाहीत. तर काही ठिकाणी कीटमधील अर्ध्याच वस्तू पोहचल्या आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक भागातील नागरिक नाराज झाले आहेत. उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर टीका केली आहे. शिंदे यांनी सेनेचं चिन्ह आणि नाव गोठवलं आणि लढायची वेळ आल्यावर भाजपला पुढे केल्याची टीका ठाकरे यांनी शिंदे यांच्यावर केली आहे. तसेच कोणालातरी विनंती करवून माघार घेतली असा टोला राज ठाकरे यांचे नाव न घेता ठाकरे यांनी लगावला आहे. शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांच्या घरावर हल्ला झाल्यानंतर राज्यातील राजकारण हे चांगलेच तापले. त्यानंतर जाधव यांनी शिंदे सरकारवर हल्ला चढवताना, सुरक्षा काढून घेतल्यानंतर आपल्या घरावर हल्ला झाल्याचे म्हटलं आहे. तसेच जर आपल्याला काही झालं तर त्याला सर्वस्वी हे सरकार जबाबदार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे. याचदरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आव्हान दिलं आहे. तसेच राष्ट्रवादीचं घड्याळ बारामतीतंच बंद पाडणार असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.